बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप; एका दिवसात 153 नव्या रुग्णांची भर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्ह्यात रविवारी दुपारी 835 जणांचा कोरोना तपासणी अहवाल आला आहे. त्यात 153 जण कोरोनाबाधित असल्याचे आढळले. तर 682 जणांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. बीड तालुक्यात सर्वाधिक 64 जण कोरोनाबाधित असल्याचे आढळले आहे.

जिल्ह्यात रविवारी दुपारी 835 जणांच्या कोरोना तपासणीचा अहवाल आला. त्यात 153 जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर 682 जण निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई येथे 9, आष्टीत 10, बीडमध्ये 64, धारूर 13, गेवराई 16, केज 6, माजलगाव 10, परळी 16, पाटोदा 2, शिरूर 5 तर वडवणी 2 असे नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. बीड जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 10 हजार 583 वर पोहचला आहे. आतापर्यंत 1 लाख 5 हजार 57 जणांच्या तपासण्या केल्या आहेत. बीड तालुक्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाबाबतचे निर्देश पाळण्यात येत नसल्याने जिल्ह्यात कोरोना संक्रमण वेगाने वाढत आहे.