
उत्तर प्रदेश हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणाने देश पेटला असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग परिसरातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. चुलत भावनेच आपल्या बहिणीला भावनेची शिकार बनवली आहे. याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अधिक तपास विजयदुर्ग पोलिसांकडे वर्ग केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी दिली.
देवगड तालुक्यातील विजयदुर्ग विभागातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर तिच्याच चुलत भावाने बलात्कार केला. कधी आडवळणावर तर कधी एकटी गाठून मुलीला जंगलात नेऊन अत्याचार केला आहे. सदर मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर सदर युवतीने आज दुपारी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.पहिल्यांदा जबरदस्तीकेली तेव्हा मुलगी घाबलेली होती तिने कोणालाच काही सांगितले नाही. त्यानंतर धमकी देऊन आडवळणी वाट अडवून जंगलभागात पुन्हा काही दिवस हा बलात्काराचा प्रकार सुरूच होता. त्यामुळे मुलगी गरोदर राहिली. ही घटना जेव्हा घरात कळली तेव्हा दबावाखाली कुटूंबाला काहीच तक्रार करता आली नाही. शनिवारी मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर तिला कणकवलीतील एक डॉक्टर कडे आणले असता ही घटना उघड झाली. मुलगी आठ महिन्याची गरोदर होती व तिला प्रसूती कळा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर मुलीची प्रसूती केली मात्र बाळाचा जन्मानंतर काही वेळातच मृत्यू झाला.
त्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक तुषार पाटील, उपविभागीय पोलीस ठाण्यात शिवाजीराव मुळीक, कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी याच्या मार्गदर्शनाखाली ,महिला पोलीस अधिकारी गायत्री पाटील यांनी पीडित मुलीची कैफियत जाणून घेऊन गुन्हा दाखल केला आहे. शून्य नंबरने गुन्हा विजयदुर्ग पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. आरोपीला तातडीने पोलिसांनी अटक करावी,अशी मागणी केली जात आहे.अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.































































