संभाजीनगर जिल्ह्यात नव्या 164 बाधितांची भर; 29,327 कोरोनामुक्त, 4,255 रुग्णांवर उपचार सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्ह्यात आज एकूण १६४ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३४५५० झाली आहे. २९३२७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  आजपर्यंत एकूण ९६८ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण ४२५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ८९ आणि ग्रामीण भागात २६ रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

मनपा क्षेत्रात २९ रुग्ण
मनपा क्षेत्रात आज २९ नवीन रुग्ण आढळून आले. यामध्ये गुलमोहर कॉलनी (१),  म्हाडा कॉलनी (१), सुदर्शन नगर (१), बालाजीनगर (१), जयभवानी नगर (१), सिंधी कॉलनी (१), जालाननगर (१), समर्थनगर (१), पडेगाव (२),  वेदांतनगर (१), एन-२ (१), मगर वस्ती (२),  सिडको महानगर (१), वानखेडे नगर (१),  टाऊन सेंटर एन-१ (१), शिवाजीनगर गारखेडा (१), रेणूकानगर (१), एन-१ सिडको (१), हर्सूल सावंगी (१), ठाकरेनगर एन-२ (१), घाटी रुग्णालय परिसर (२) भावसिंगपूरा (२), विशाल नगर (१), गारखेडा (१), विश्वभारती कॉलनी (१),

ग्रामीण भागात २० रुग्ण
ग्रामीण भागात आज २० रुग्ण आढळून आले. यामध्ये फुलंब्री (१), तिसगाव (१), साई मंदिर बजाज नगर (१), माळी गल्ली रांजणगाव (१), लासूर (५), पैठण (४), लक्ष्मी नगर वैजापूर (२), पिंपरखेडा कन्नड (२), दहेगाव (१), धनगरवाडी आवाळा कन्नड (१), पिंपळवाडी पैठण (१),

दहा कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत विश्रांतीनगर येथील ६५ वर्षीय पुरूष, काळा दरवजा किलेअर्क येथील ८५ वर्षीय स्त्री, हर्सूल येथील ५१ वर्षीय पुरूष, लांजी वाळूज गंगापूर येथील ५६ वर्षीय पुरूष, कोल्टनवाडी रोड हर्सूल  येथील ७३ वर्षीय पुरूष, भवानी नगर येथील ८५ वर्षीय पुरूष, बिडकीन पैठण येथील ५७ वर्षीय पुरूष, सिडको एन-४ येथील ८५ वर्षीय पुरूष, शिवाजीनगर येथील ६८ वर्षीय पुरूष, क्रांतीचौक येथील ७२ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.