
उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात एका दलित मुलीवर सामुहिक बलात्काराची घटना ताजी असताना एका 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला आहे. त्यानंतर पीडित मुलीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली नाही असा आरोप पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे.
पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार तीन महिन्यांपूर्वी त्यांच्या दोन मुली मावशीच्या घरी गेल्या होत्या. तेव्हा मावशीच्या मुलाने 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. तिला रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला न पकडता एका मनोरुग्ण तरुणाला अटक केली आहे. त्याविरोधात पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीचा मृतदेह रस्त्यात ठेवून आंदोलन केले. तसेच खर्या आरोपीला अटक करावी अशी मागणी केली आहे.























































