‘इसबार दुश्मन हाथ लगेगा, तो बचेगा नही’ मिर्झापूर-2 चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बहुप्रतिक्षित वेबसीरीज मिर्झापूरच्या दुसर्‍या सीजनचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. गुन्हेगारी विश्वातून सुरू झालेली सीरीजमध्ये आता रिव्हेंज ड्रामा दिसणार आहे.

पहिल्या सीजनमध्ये बबलू पंडित आणि स्वीटी गुप्ताचा मृत्यू होतो. त्यात गुड्डू पंडित सुदैवाने वाचतो. आता कालीन भैय्या आणि मुन्ना यांच बबलूशी सामना होणार आहे. इतकेच नाही तर रती शंकरचा मुलगाही आता गुड्डू पंडितच्या मागे असणार आहे. नवीन सीजनमध्ये जास्त ऍक्शन पहायला मिळणार आहे असे ट्रेलरमध्ये दिसून येत आहे. नवीन सीजनमध्ये विजय वर्मा, अंजुम शर्मा यांच्याही भुमिका असणार आहेत. मिर्झापूरचा दुसरा सीजन 23 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी ऍमेझॉन पहिला सीजन प्रेक्षकांसाठी मोफत उपलब्ध करून दिला आहे,