Video – हाथरस घटनेविरोधात चंद्रपुरात शिवसेनेचे निदर्शन, उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हाथरस येथे झालेल्या कथित सामुहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरले आहे. अशातच सरकारच्या दडपशाहीने तर देशाची मान शरमेने झुकली आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या विरोधात चंद्रपुरात महिला शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर शिवसेना नेत्या मनस्वी गिर्हे यांच्या नेतृत्वात निदर्शन करण्यात आली.

बलात्काराच्या वाढत्या घटना आणि अशा अमानुषपणा करणाऱ्या गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या उत्तर प्रदेश येथील योगी सरकार विरोधात सर्वत्र संतापाची लाट पसरत आहे. उत्तर प्रदेश सरकार महिलांच्या सुरक्षते बाबत अपयशी ठरलं आहे. त्यामुळं उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करण्यात यावं व बलात्कार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी, असं शिवसेना नेत्या मनस्वी गिर्हे यांनी मागणी केली आहे. यावेळी भारती दुधानी, कुसुमताई उद्दार यांच्यासह शेकडो महिला शिवसैनिक उपस्थित होत्या.