
हिंदुस्थान, अमेरिकेनंतर आता कट्टर मित्र पाकिस्तानने देखील चीनला दणका दिला असून TikTok या ऍपवर बंदी घातली आहे. या ऍपमुळे अनैतिक गोष्टीला प्रोत्साहन मिळत असून समाजात अश्लीलता पसरत आहे, असा आरोप झाल्यानंतर पाकिस्तान दूरसंचार विभागाने (पीटीआय) TikTok ला चेतावणी दिली होती. मात्र यानंतरही कोणतीही कारवाई न झाल्याने ऍप बंद बॅन निर्णय घेतला.
समाजात अश्लीलला पसरत असल्याच्या अनेक तक्रारी आम्हाला प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे पीटीआयने म्हटले आहे. पाकिस्तानमधील ‘जिओ न्यूज’ याबाबत वृत्त दिले असून समाज विघातक कृत्य रोखण्यास टिकटॉक अपयशी ठरल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.


























































