काँग्रेसचा हात सोडून अभिनेत्री खुशबू भाजपात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री आणि राजकारणात सक्रिय असलेल्या खुशबू सुंदर यांनी काँग्रेसचा हाथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान, काँग्रेसने त्यांना पक्षाच्या प्रवक्तेपदावरून हटवले आहे.

तामीळनाडू काँग्रेस नेत्या असणाऱया खुशबू सुंदर यांच्या भाजप प्रवेशाकिविषयी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. सोमवारी त्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पत्र पाठवून दिले. विशेष म्हणजे यासोबत त्यांनी एक पत्रदेखील दिलं असून त्यात पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर आरोप केले आहेत.

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सन 2010 मध्ये खुशबू सुंदर यांनी राजकारणात पाऊल ठेकले. सर्वप्रथम डीएमके पक्षात प्रवेश केला. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मात्र, आता त्यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.