
मुंबई-आग्रा महामार्गावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संजय शिंदे यांच्या गाडीला शॉर्टसर्किटमुळे आग लागली, परंतु त्यांच्या गाडीत असलेल्या सॅनिटायझरमुळे आग वाढली आणि या आगीत होरपळून शिंदे यांचा मृत्यू झाला. नाशिकमधील द्राक्षांचे व्यापारी असणारे संजय शिंदे हे द्राक्ष बागेसाठी कीटकनाशके आणण्यासाठी पिंपळगावला निघाले होते. कडवा नदीवरील ओव्हरब्रिजजवळ असताना त्यांच्या गाडीत बिघाड झाला आणि शॉर्टसर्किट होऊन गाडीला आग लागली. कारचा सेंट्रल लॉक लागल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही आणि त्यांचा होरपळून मृत्यू झाला.
























































