
शनिवारी दुपारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये 706 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 117 जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. तर 589 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. बीड जिल्ह्यातील 87 रूग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात शनिवारी दुपारी 706 जणांचा अहवाल प्राप्त झाला. त्यातील 117 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. 589 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. आजच्या अहवालामध्ये अंबाजोगाई 16, आष्टी 2, बीड 45, धारूर 9, गेवराई 7, केज 9, माजलगाव 3, परळी 9, पाटोदा 6, शिरूर 5 आणि वडवणीमध्ये 6 रूग्ण सापडले.
बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकुण 12 हजार 74 जणांना बाधा झाली आहे. त्यातील 10 हजार 252 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1441 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 87 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंत 381 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.


























































