जिओ 2500 ते 3 हजार रुपयांत देणार 5 जी स्मार्टफोन!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिलायन्स जिओ आता आणखी एक मोठा धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. एकीकडे बाजारात फाईव्ह जी स्मार्टफोनच्या किंमती 27 हजार रुपयांच्या पुढे असताना जिओ केवळ 2500 ते 3 हजार रुपयांच्या आत ग्राहकांना फाईव्ह जी स्मार्टफोन देण्याच्या तयारीत आहे. जिओच्या अधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार, पाच हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत फाईव्ह जी स्मार्टफोन बाजारात आणण्याची कंपनीची योजना आहे.