
राज्यातील पूर परिस्थिती, कोरोना व तांत्रिक अडचणीमुळे विविध विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न देता आलेल्या विद्यार्थ्यांना 10 नोव्हेंबरपूर्वी पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. सीईटी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनाही पुन्हा एक संधी दिली जाईल अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. याबाबत शुक्रवारी विद्यापीठांच्या पुलगुरुंची बैठक झाली. त्यानंतर आज आयोजित पत्रकार परिषदेत उदय सामंत यांनी ही माहिती दिली.
मुंबई विद्यापीठ आयडॉल परीक्षेसंदर्भात जो सायबर हल्ला झाला त्याबाबत सायबर सेलकडे तक्रार केली आहे. अमरावती विद्यापीठादरम्यान परीक्षेबाबत गोंधळ झाला. त्यामध्ये परीक्षांचे काम दिलेल्या कंपनीने सहकार्य न केल्याने हा गोंधळ झाल्याचे त्यांनी सांगितले.



























































