बिहारमध्ये रक्तरंजित प्रचार, जेडीआरपीच्या उमेदवाराची गोळय़ा झाडून हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने शनिवारी सायंकाळी रक्तरंजित वळण घेतले. जनता दल राष्ट्रवादीच्या (जेडीआरपी) उमेदवाराची गोळय़ा झाडून हत्या करण्यात आली, तर गोळीबारात एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर पळणाऱया एका हल्लेखोराला संतप्त जमावाने पकडून बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला, तर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

शिवहर जिल्ह्यातील हथसार गावात ही घटना घडली. श्रीनारायण सिंह असे हत्या झालेल्या उमेदवाराचे नाव आहे. सिंह व त्याच्या कार्यकर्त्याला गंभीर जखमी अवस्थेत सुरुवातीला सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच दोघांना मृत घोषित करण्यात आले.

सिंहच्या छाती व शरीराच्या इतर भागांत तीन गोळ्या लागल्या. हल्लेखोर कार्यकर्ते असल्याचे भासवून सिंहच्या प्रचारफेरीत सहभागी झाले होते. हल्लेखोरांची नावे उघडकीस आलेली नाहीत.