
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्याला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस मिळून 30 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आले आहे. स्वप्निल राजु चव्हाण (वय 24, रा. दांडेकर पुल) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
दांडेकर पुलाजवळ एकजण पिस्तुल घेऊन थांबला असल्याची माहिती पोलिस कर्मचारी शिवाजी क्षिरसागर आणि राहुल ओलेकर यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून स्वप्निलला ताब्यात घेतले.
चौकशीत त्याच्याकडे पिस्तूल बाळगण्याचा परवाना नसल्याचे उघडकीस आले. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार, कुंदन शिदे, महेश गाढवे, अमित सुर्वे, सागर सुतकर, राहुल ओलेकर, शिवाजी क्षिरसागर, शरद राऊत, अक्षयकुमार वाबळे, नवनाथ भोसले, प्रमोद भोसले यांच्या पथकाने केली.

























































