दीपिकाची मॅनेजर करिश्माच्या घरावर एनसीबीचा छापा; ड्रग्ज मिळाल्याची माहिती; पुन्हा चौकशी होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी समोर आलेल्या बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी एनसीबीने पुन्हा एकदा आपल्या चौकशीचा वेग वाढविला आहे. याप्रकरणी एनसीबीने अभिनेत्री दीपिका पदुकोनची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिच्या घरावर छापा टाकला असून यात तिच्या घरातून काही प्रमाणात ड्रग्ज मिळाल्याची माहिती हाती आली आहे.

दरम्यान, याप्रकरणी पुन्हा एकदा करिश्माची चौकशी होणार असून एनसीबीने करिश्माला पुन्हा समन्स बजाविल्याची माहिती हाती आली आहे. या अगोदर एनसीबीने करिश्माची दोनवेळा चौकशी केली आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी समोर आलेल्या बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी एनसीबीने दीपिका पदुकोनसह इतर काही अभिनेत्री आणि त्यांच्या मॅनेजरची चौकशी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा एनसीबीने याप्रकरणी चौकशी सुरु केली असल्याची माहिती समोर आली आहे.

एनसीबीने आता अभिनेत्री दीपिका पदुकोन हिची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिच्या घरी छापा टाकला. यावेळी करिश्मा प्रकाश घरात उपस्थित नसल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे एनसीबीने करिश्माला पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलविले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनसीबीच्या चौकशीत काही ड्रग्ज पॅडलरांनी देखील करिश्मा प्रकाश हिचे नाव घेतल्याचे कळते.

त्या व्हॉटसअॅप चॅटने वाढविल्या अडचणी
ज्या व्हॉटसअॅप चॅटच्या माध्यमातून हा सर्व प्रकार समोर आला आहे. त्यामुळे अभिनेत्री दीपिका पदुकोनच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या व्हॉटसअॅप चॅटमध्ये हॅश आणि कीड या शब्दांचा प्रयोग करण्यात आलेला आहे. त्यामुळे जर पुन्हा चौकशी झाल्यास अभिनेत्री दीपिका पदुकोन हिच्या अडचणीत वाढ होऊ शकते, असे तज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

असे आले प्रकरण उजेडात
अभिनेत्री दीपिका पदुकोन हिची मॅनेजर करिश्मा प्रकाश ‘क्वान’ या कंपनीत कामाला आहे. ही कंपनी अनेक सेलिब्रेटीजच्या मॅनेजर पुरविण्याचे काम करते. अभिनेत्री रिया चक्रकर्ती हिची मॅनेजर जया साहा ही देखील याच कंपनीमध्ये काम करते. अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणी ज्यावेळी एनसीबी, सीबीआय आणि ईडीने जया साहाची चौकशी केली. त्याकेळी करिश्मा प्रकाश हिचे नाव समोर आले. त्यानंतर हे सर्व प्रकरण उजेडात आल्याचे बोलले जात आहे.