
केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाने आज मंगळूर विमानतळ 50 वर्षांच्या भाडेतत्वावर अदानी उद्योग समूहाकडे हस्तांतरित केले. अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळ, लखनौमधील चौधरी चरणसिंह त्याचप्रमाणे जयपूर आणि तिरुवनंतपुरम येथील विमानतळासह मंगळूर विमानतळाचे हक्क अदानींना देण्याचा करार फेब्रुवारी 2019 मध्येच झाला होता. या विमानतळांचे खासगीकरण हे फायदेशीर असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे होते. या कराराच्या माध्यमातून अदानी समूहाने नागरी उड्डाण सेवा क्षेत्रात पाऊल ठेवले होते.
























































