
डेक्कन परिसरात एका हाय प्रोफाइल जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकांनी छापेमारी करत 12 जणांना ताब्यात घेतले आहे. अनेक दिवसांनी हाय प्रोफाइल जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत.
युनूस मोहमद अलीउद्दीन (वय 33), ओमप्रकाश श्रीकृष्ण मिश्रा (वय 48), बलीकुमार श्रीराम मंडल (वय 19), सलमान नसरुद्दीन खान (वय 21), संदीप चंद्र गोवेकर (वय ४२), भुवन चक्रदेव ओझा (वय 29), सुरेश देव चंद्र (वय 36), राधवेंद्र भुपेंद्र प्रताप (वय 45),अरेंद्र दलबहादूर मिस्टा (वय 35), नवनाथ सखाराम गावडे (वय 26) आणि मालक थॉमस लोबो व प्रफुल्ल देवकुळे अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गुन्हे शाखेच्या युनिट एकमधील उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी यांनी फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांना डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोरवाल बिल्डिंगमध्ये अंदर बहार हा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्याठिकाणी गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. यावेळी जुगार खेळत असताना 10 जणांना पडण्यात आले आहे. तर चालक थॉमस आणि देवकुळे यांनाही ताब्यात घेतले आहे

























































