
टीव्हीस मोर्ट्स कंपनीने सणासुदीचा मुहूर्त साधून हिंदुस्थानी बाजारात आपली नवीन दमदार बाईक Apache RTR 200 4V लॉन्च केली आहे. नवीन TVS Apache RTR 200 4V BS6 विविध राइडिंग मोड आणि ऍडजेस्टेबल सस्पेंशन देण्यात आले आहे. हे दोन्ही फीचर्स या बाईक सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच देण्यात आले आहेत. हे फीचर्स नेहमीच अधिक किंमत असलेल्या बाईकमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कंपनीने Apache RTR 200 4V ची बुकिंग सुरु केली आहे. आज आम्ही तुम्हाला या बाईकची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल माहिती सांगणार आहोत.
रायडींग मोड्स
TVS Apache RTR 200 4V मध्ये तीन रायडींग मोड्स देण्यात आलेत आहेत. ज्यात Sport, Urban आणि Rain चा समावेश आहे. या बाईकमध्ये डेडिकेटेड राइड मोड स्विच देण्यात आला आहे. ज्याचा वापर करून तुम्ही धावत्या बाईकमध्ये तुम्ही मोड्स स्विच करू शकता.

फीचर्स
कंपनीने यात इंधन इंजेक्शन, स्लिपर क्लच, ब्लूटूथ स्मार्ट एक्सोनेक्ट सिस्टम आणि ग्लाइड थ्रो टेक्नॉलॉजी (जीटीटी +) सारखे फीचर्स दिले आहेत.
पॉवर आणि स्पेसिफिकेशन्स
TVS Apache RTR 200 4V मध्ये 198 सीसी सिंगल सिलिंडर 4 व्हॉल्व्ह, ऑइल कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. जे 8500 Rpm वर 20.2 bhp ची पॉवर आणि 7000 Rpm वर 18.1 Nm टॉर्क जनरेट करते.
किंमत
कंपनीने या बाईकची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत सिंगल चॅनेल एबीएस व्हेरिएंटसाठी 1.25 लाख रुपये आणि ड्युअल चॅनेल एबीएस व्हेरिएंटसाठी 1.31 लाख रुपये इति ठेवली आहे.




























































