
उत्तर प्रदेशच्या कुशीनगर भागात एका फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार कुशीनगर भागात एका बेकादेशीर फटाक्याच्या कारख्यान्यात भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की त्यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच अनेक जखमीही झाले आहेत. या स्फोटामुळे आजूबाजुच्या घरांनाही हादरा बसला आहे तसेच काही घरांचे नुकसानही झाले आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे.























































