
बिहारच्या भागलपूरमध्ये 100 प्रवासी असलेली एक बोट उलटली आहे. या अपघातात 5 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवासी बेपत्ता आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार भागलपुरमधील तिनटंगा भागात एक बोट निघाली होती. त्यात 100 प्रवासी होते. जेव्हा बोट नदीच्या घाटातून निघाली तेव्हा सुस्थितीत होती. नंतर नदीच्या प्रवाहामुळे संपूर्ण बोट उलटली. त्यात 5 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. तसेच 15 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
Bihar: Several people missing after a boat capsized in Naugachhia area of Bhagalpur earlier today. There were over 100 people on board the boat, rescue and search operation underway. pic.twitter.com/2pre5AtBwW
— ANI (@ANI) November 5, 2020
सर्व वाचवण्यात आलेल्या प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केले. नावेतील अनेक प्रवासी बेपत्ता आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांचा शोध सुरू आहे. अनेक प्रवासी बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.

























































