रोहित हिंदुस्थानी खेळाडूंसह ऑस्ट्रेलियाला रवाना होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रोहित शर्माने मागील दोन लढतींमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले आहे. बीसीसीआयकडूनही आता याची दखल घेण्यात येण्याची शक्यता आहे. हिंदुस्थानचा संघ 11 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. टीम इंडियासोबत रोहीत शर्माही प्रयाण करील. कदाचित 27 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱया वन डे मालिकेसाठी त्याला विश्रांती देण्यात येऊ शकते. त्यानंतर टी-20 व कसोटी मालिकेपर्यंत तो पूर्णपणे फिट झाल्यास टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करू शकतो. अशी माहिती सूत्रांकडून यावेळी देण्यात आली.