सुधरा अन्यथा स्मशानात पाठवू, पश्चिम बंगालच्या भाजप प्रदेशाध्यक्षांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. तृणमूलच्या कार्यकर्तांना धमकी देत घोष म्हणाले की सुधरा अन्यथा तुमचे हात पाय तोडले जातील, तरी नाही सुधरले तर तुम्हाला स्मशानात पाठवू असे वक्तव्य घोष यांनी केले आहे.

2021 मध्ये पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत 294 पैकी 200 जागा जिंकू असा निर्धार भाजपने व्यक्त केला आहे.

एका सभेत घोष म्हणाले की, जेव्हा बिहारमध्ये लालू प्रसाद यांचे राज्य होते तेव्हा बिहारमध्ये जंगल राज होते, दररोज हिंसा घडत होती. पण आम्ही गुंडांना बाहेर काढले, याला भाजप राज्य म्हणतत. आम्ही जंगल राजचे रुपांतर लोकशाहीत केले. आम्हाला पश्चिम बंगालमध्येही लोकशाही आणू इच्छितो.”

घोष म्हणाले की “दीदीच्या भावांनी पुढील सहा महिन्यांत आपल्या सवयी बदलल्या पाहिजेत. अन्यथा तुमचे हात पाय मोडले जातील. तुम्हाला रुग्णालयाची यात्रा करावी लागले, तरी नाही सुधरले तर तुम्हाला स्मशानात जावे लागेल असेही घोष म्हणाले.

घोष यांनी अशा प्रकारे वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही यापूर्वी त्यांनी कोरोना विषाणू नष्ट झाल्याचे जाहीर केले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमर रहे अशा घोषणाही दिल्या होत्या.