
चंद्रपुरात पारा घसरला आहे. रविवारी 10 अंशावर असलेला पारा 8.6 अंशांवर आल्याने हुडहुडी जाणवू लागली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात यंदा केवळ 76 टक्के पावसाची नोंद झाली आहे. मात्र दिवाळीच्या सुमारास असणाऱ्या थंडीची सुरुवात झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
रात्री आणि पहाटेदेखील शेकोटीचा वापर वाढला आहे. पुढचे काही दिवस चंद्रपुरात थंडीचा मुक्काम राहण्याची चिन्हे आहेत. यंदा कोरोना काळामुळे प्रतिकारशक्ती वाढती राहावी, यासाठी सकाळी फिरायला जाणार्यांची गर्दी वाढली आहे. बोचऱ्या थंडीत सकाळची फिरस्ती आणि व्यायाम याकडे नागरिक आवर्जून लक्ष देताहेत.




























































