पुणे – मेडीकलवर दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

मेडीकलवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तिघांच्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केले. त्यांच्याकडून मिरचीपूड, पालघन, दुचाकी असा मिळून 64 हजारांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई काल सहकानगरमधील तळजाई दक्षिणेकडे जाणाऱ्या चौकात करण्यात आली.

अजय बाळू ओव्हाळ (वय 30) शुभम सुनील शिंदे (वय 25) आणि विनायक महादेव कांबळे (वय 28 सर्व रा. कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांचे दोन साथीदार फरार आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.

गुन्हे शाखेचे पथक सहकानगर परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी तळजाई परिसरात काहीजण संशयास्पद थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून अजय, शुभम आणि विनायकला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पालघन, मिरचीपूड, दुचाकी मिळून आले. अधिक चौकशीत ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे उघडकीस आले.

अजय हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ ठाण्यातंर्गत चार गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील ताकवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर, पोलीस उपनिरीक्षक बापू खेंगरे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, हनुमंत शिंदे, सुनील कुलकर्णी, अजय थोरात, अशोक माने, इम्रान शेख, अमोल पवार, महेश बामगुडे, तुषार माळवदकर यांच्या पथकाने केली.