
ऐन दिवाळी सणाच्या मुहूर्तावर परंपरेनुसार शेळ्यामेंढ्या च्या आंघोळ करण्याकरिता गावानजीक तलावातील पाण्यात उतरले असता खोल पाण्याचा अंदाज न आल्याने सख्या तीन भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना भंडाराच्या लाखांदूर तालुक्यातील पुयार येथे घडली. पुयार तलावातील लक्ष्मीपूजनच्या दिवशी 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास घडली. मृतक मधुकर नीलकंठ मेश्राम 42, सुधाकर नीलकंठ मेश्राम 39, व प्रदीप नीलकंठ मेश्राम राहणार या सख्ख्या भावाचे नाव होते .
घटनेच्या दिवशी 13 वर्षीय बालकाला घेऊन मालकीच्या अंदाजे शंभर शेळ्या मेंढ्या घेऊन आंघोळीसाठी गावाजवळील तलावात नेले होते . यावेळी प्रारंभी मृतक मधुकर हा शेळ्या-मेंढ्यांना आंघोळीसाठी खोल पाण्यात उतरला मात्र शेळ्या-मेंढ्या पाण्याबाहेर पडताना . मृतक मधुकर बुडत असल्याचे पाहून मृतक सुधाकर दुसऱ्या भावाने पाण्यात उडी घेतली . तोदेखील बुडताना दिसले यांचे तिसऱ्या प्रदीपने उडी घेतली . मात्र खोल पाण्याचा अंदाज न लागल्याने एकमेकाचा पाण्यात बुडून दुर्दैवाने मृत्यू झाला .




























































