
दिवाळी सणामुळे पालेभाज्यांना मागणीच नसल्याने दर घसरले आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी कोथिंबिरीला किमान 50 पैसे, तर मेथी, शेपू व पालक यांना अवघा एक रुपया जुडी दर मिळाला. फळभाज्यांचे दरही किलोमागे एक ते सात रुपयांनी घसरले आहेत.
नाशिक येथे काल कोथिंबिरीची आवक 2 लाख 40 हजार जुडय़ा होती. दर किमान 50 पैसे, कमाल साडेसात व सरासरी साडेचार रुपये होता. मेथीची आवक 62 हजार 300 जुडय़ा, दर 1-11-6 मिळाला.
शेपू- 1-10-5 ; पालक- 1-3-2; कांदापात- 10-45-30 असे दर होते. परवाच्या तुलनेत पालेभाज्यांच्या दरात जुडीमागे 1 ते 13 रुपयांनी घसरण झाली. आवक स्थिर असूनही मागणीअभावी भाव घसरल्याची माहिती बाजार समितीतील सूत्रांनी दिली.



























































