लॉकडाऊनमध्ये गावोगावी वाढला इंटरनेटचा वापर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंटरनेट वापरात यावेळी ग्रामीण भागाने बाजी मारली आहे. देशाच्या ग्रामीण भागात मोबाईल डेटा 30 टक्क्यांनी वाढला आहे. तज्ञांच्या मते कोरोनाच्या भीतीमुळे मजूर मोठय़ा प्रमाणात गावी गेल्याने इंटरनेट वापर वाढलाय.

शहरांमध्ये एप्रिल ते सप्टेंबर या काळात 15 ते 20 टक्के मोबाईल डेटाचा वापर झाला आहे. रिलायन्स जिओ आणि एअरटेल या कंपन्यांनी मोबाईल डेटावर काही ऑफर्स दिल्या आहेत. त्याचा फायदा युजर्सनी उचलला आहे. लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण हिंदुस्थानात वायरलेस ब्रॉडब्रँड सुविधा वाढली आहे. त्यामुळेच इंटरनेटचा वापर वाढलाय.

फोनवरचं बोलणं झालं कमी

ग्रामीण भागांत इंटरनेटचा वापर वाढला असला तरी फोनवरील बोलण्यात 5 टक्के घट झालेली दिसत आहे. बहुतांश मजूर शहरांमधून गावी गेल्याने त्यांचे पह्नवर बोलणे कमी झाले आहे. आकडेवारीनुसार, जून ते ऑगस्ट दरम्यान रिलायन्स जियोने 27.6 लाख आणि भारती एयरटेलने 14. 7 लाख नवे मोबाईल युजर्स जोडले आहेत.