
ऑनलाईन खरेदीबरोबर सायबर क्राईममध्येही वाढ झाल्याचे एका सर्व्हेक्षणातून समोर आले आहे. सण-उत्सवांमध्ये ऑनलाईन खरेदी ही सायबर क्राइमसाठी उत्तम संधी असल्याचे त्यात म्हटले आहे.
मैफी कॉर्पने आपल्या 2020 हॉलिडे सीझनः स्टेट ऑफ टुडे ‘डिजिटल ई-शॉपी इंडिया सर्वेक्षणातून निष्कर्ष जाहीर केले आहेत, ज्यावरून असे दिसून येते की ग्राहकांना या उत्सवांमधील ऑनलाइन धोका आणि घोटाळ्यांविषयी माहिती असूनही ते अधिक ऑनलाइन शॉपिंग करण्याचा विचार करीत आहे. यावर्षी जागतिक घटनांमुळे हिंदुस्थानी ग्राहकांच्या वागणुकीत बदल झाला आहे आणि ते आता बहुतांश कामे ऑनलाईन करत आहेत, ज्यामुळे ऑनलाइन धोका वाढला आहे .



























































