कैफची अश्विनसाठी बॅटिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन याने अखेरचा वन डे आणि टी-20 सामना 2017 सालामध्ये खेळला. हा खेळाडू हिंदुस्थानच्या कसोटी संघात कायम असतो. पण झटपट क्रिकेटमध्ये त्याला संघात स्थान दिले जात नाही. यावेळी माजी क्रिकेटपटू मोहम्मद पैफ याने रविचंद्रन अश्विनसाठी बॅटिंग करताना म्हटले की, रवी अश्विन हा टी-20 क्रिकेटमध्येही हिंदुस्थानसाठी मोलाची कामगिरी करू शकतो.

रविचंद्रन अश्विनने आयपीएलच्या या मोसमात दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व केले. त्याने 15 सामन्यांमध्ये 13 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याने फक्त 7.66च्या इका@नॉमीसह धावा दिल्या. त्यामुळे मोहम्मद कैफने त्याची बाजू मांडली आहे. एवढेच नव्हे तर रविचंद्रन अश्विनने विराट कोहली, रोहित शर्मा, कायरॉन पोलार्ड, ख्रिस गेल, क्विंटॉन डी कॉक, जोस बटलर, स्टीवन स्मिथ, निकोलस पूरण यांसारख्या दिग्गज फलंदाजांनाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे त्याचा समावेश हिंदुस्थानी संघात करण्यात यावा असे मोहम्मद कैफला वाटते.