‘भाजप येणार, मुंबई घडवणार’ – महापालिका निवडणुकीची भाजपची तयारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
cm-devendra-fadnavis

महापालिका निवडणुकीसाठी भाजप तयारीला लागली असून बुधवारी कार्यकारिणीच्या बैठकीत ‘भाजप येणार, मुंबई घडवणार’ ही घोषणाही यावेळी देण्यात आली.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘वसंत स्मृती’ येथे झालेल्या बैठकीत संघटनात्मक बांधणी आणि निवडणुकीची रणनीती यावर चर्चा झाली.

जनतेचा विचार करणारे लोक पालिकेच्या सत्तेत आणावे लागतील असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. राज्य सरकारने प्रकल्पांना केवळ विरोध करण्यापलीकडे काहीच केले नाही. शेवटी प्रत्येक प्रकल्पात रोजगार मराठी माणसालाच मिळणार आहे. तरीही यांचे काम विकासविरोधी आहे असे फडणवीस म्हणाले.

कोरोना काळातील भ्रष्टाचारावर पुस्तिका लवकरच प्रकाशित करू असे सांगून फडणवीस म्हणाले, आतापर्यंत टीका करायची नाही हे ठरवले होते, पण आता मात्र बोलणार. आमच्या सरकारच्या काळात मुंबईचे सारे प्रकल्प मार्गी लागले. सामान्य मराठी माणसाच्या हिताचे प्रकल्प आता मात्र थंड बस्त्यात गेले आहेत, अशी टीका त्यांनी केली. हिंदुत्व बोलून सांगण्याचा विषय नाही. तो कृतीतून दाखविण्याचा विषय आहे. काल अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर ओरडणारे विचारवंत आज गप्प का आहेत, असा सवालही त्यांनी केला.