
जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला एक कैदी येरवडा खुल्या कारागृहातुन पळाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कैद्याने नैसर्गिक विधी करण्यास जात असल्याचे कारण सांगून पळ काढला आहे. ही घटना काल सकाळी अकराच्या सुमारास घडली.
अजय पीटर तोपुन (मूळ- झारखंड) असे कारागृहातुन पळालेल्या कैद्याचे नाव आहे. पौड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अजय तोपून याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्यानंतर तो येरवडा जिल्हा खुले कारागृहात शिक्षा भोगत होता.
काल सकाळी साडेदहाच्या सुमारास त्याने नैसर्गिक विधी करण्याचा बहाणा केला. त्यानंतर तो खुल्या कारागृहातुन पळून गेला आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक बनसवडे तपास करीत आहेत.



























































