शाळा बंदचा निर्णय योग्यच, मुंबई महापालिकेच्या केवळ 6 हजार पालकांनीच दिले हमीपत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने 31 डिसेंबरपर्यत शाळा बंद ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी स्वागत केले आहे.

महापालिकेच्या शाळेत शिकणाऱया नववी, दहावीच्या केवळ 5 हजार 601 विद्यार्थ्यांच्या पालकांनीच पाल्यांना शाळेत पाठविण्यासाठीचे हमीपञ दिले आहे. शिक्षकांच्या मते मुंबई परिसरात कोरोनाचा संसर्ग पाहता शाळा बंद ठेवण्याचा निर्णय योग्य आहे.

23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यतचे वर्ग सुरू होणार आहेत. बऱयाच शाळांनी वर्ग सुरू करण्यासाठी तयारीही केली आहे. तसेच शिक्षकांची कोरोना चाचणीही करण्यात आली. माञ पालकच विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास उत्सुक नसल्याचे चित्र आहे.

– मुंबई महापालिका शाळेत नववी, दहावीचे एकूण 35 हजार 670 विद्यार्थी आहेत.

– 20 नोव्हेंबरपर्यत त्यातील केवळ 5 हजार 601 विद्यार्थ्यांच्या पालकांनीच पाल्याला शाळेत पाठविण्यासाठीचे हमीपत्र दिले.

– 31 डिसेंबरपर्यत शाळा बंद ठेवण्याची घोषणा झाली नसती तर हमीपञ देणार्या पालकांची संख्या वाढली असती, असा विश्वास पालिका शिक्षण विभागाने
व्यक्त केला.

पालिकेच्या 412 शिक्षकांची कोरोना चाचणी

पालिका शाळेतील एपूण 1 हजार 161 शिक्षकांपैकी 20 नोव्हेंबरपर्यत 412 शिक्षकांची कोरोना तपासणीची आरटीपीसीआर चाचणी पार पडली. यातील एकही शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह सापडला नाही.