
मुंबई आणि ठाणेनंतर आता पुणे शहरातील शाळदेखील 23 नोव्हेंबरला सुरु होणार नाहीत. पुण्यात गेल्या चार दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णांचा आकडा वाढतच असल्याने शहरातील 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
राज्यातल्या शाळामधील 9वी ते 12वीपर्यंत वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्यासाठी राज्यसरकारने परवानगी दिली आहे. मात्र, स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन स्थानिक प्रशासनाने शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावेत, असेही निर्देश शालेय शिक्षषमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले होते. त्यानुसार पुणे शहरात गेल्या चार दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णांचा आकडा वाढतच असल्याने शहरातील 9 वी ते 12 वी पर्यंतच्या खासगी आणि महापालिकेच्या शाळा 13 डिसेंबर पर्यंत बंदच ठेवण्याचा निणेय घेतला आहे अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.याबाबत आयुक्त विक्रम पुमार यांच्याशी चर्चा करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे असेही त्यांनी स्पष्ट केले .
येत्या 13 डिसेंबरला कोरोना स्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. पालकांशी चर्चा करुन आणि सध्यस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेतला जाणार आहे.राज्यात विविध ठिकाणी वेगवेगळ्या वेळी शाळा सुरू होणार आहेत. शाळा सुरू होणार म्हणून पालकांंच्या मनात भिती निर्माण झाली होती. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना मुलांना शाळेसाठी घराबाहेर पाठवण्यासाठी पालकांची इच्छा होत नव्हती. अखेर,पुणे महापालिका स्थानिक प्रशासनाने तूर्तास शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेऊन पालकांना एक प्रकारे दिलासाच दिला आहे.






















































