अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्यासाठी मुलाकडून वडिलांचा खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

झारखंडमध्ये एका मुलाने आपल्या वडिलांचा खून केला आहे. अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी म्हणून त्याने आपल्या वडिलांचा खून केल्याचे समोर आले आहे.

झारखंडमध्ये कृष्णा राम हे राष्ट्रीय कोळसा विकास निगममध्ये सुरक्षा रक्षकपदावर कार्यरत होते. कृष्णा राम आपल्या 55 वर्षीय मुलासोबत राहत होते. त्यांच मुलगा अनेक दिवस बेरोजगार होता. वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाला कंपनीत नोकरी मिळते असा नियम आहे. म्हणून त्याने आपल्या वडिलांचा गळा चिरून खून केला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे.