कोल्हापूर – पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत शिवसेनेने पाकिस्तानचा झेंडा जाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन पाकिस्तानकडुन जम्मु काश्मीर येथे हिंदुस्थानच्या सैन्यावर सुरू असलेल्या बेछुट गोळीबारात आठवड्यात कोल्हापूरचे दोन जवान शहिद झाले. त्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. आज सायंकाळी करवीर शिवसेनेच्या वतीने पाकिस्तानच्या ध्वजाची होळी करुन,पाकिस्तानचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी हिंदुस्थान सरकारने या शहिद जवानांचा बदला घेण्यासाठी घोषणाही देण्यात आल्या.

जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या भ्याड हल्ल्यात निगवे खालसा (ता.करवीर) येथील जवान हवालदार संग्राम शिवाजी पाटील यांना शुक्रवारी मध्यरात्री वीरमरण आले.गेल्याच आठवड्यात शुक्रवारी ऐन दिवाळीच्या पुर्वसंध्येला (दि.13 नोव्हेंबर) रोजी जम्मू-काश्मीर मधील पुंछ जिल्ह्यात झालेल्या चकमकीत बहिरेवाडी(ता.आजरा) येथील ऋषीकेश रामचंद्र जोंधळे हे जवान शहीद झाले होते.आठच दिवसात कोल्हापूरचे दोन जवान शहीद झाल्याने पाकिस्तान विरोधात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.

करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने उंचगाव हायवे चौकात शहीद वीर जवान संग्राम पाटील व ऋषीकेश जोंधळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.यानंतर पाकिस्तान विरोधात जोरदार निदर्शने करत,पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला.यावेळी ‘अमर रहे,अमर रहे,वीर जवान संग्राम पाटील अमर रहे, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘जलादो जलादो,पाकिस्तान जलादो’ अशा घोषणा देऊन शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव ,विनोद खोत,शिवानंद स्वामी,संभाजी भोकरे, विक्रम चोगुले,सागर पाटील,संतोष चोगुले,प्रफुल घोरपडे,दीपक पोपटानी,सुनील पारपाणी, बाळासाहेब नलवडे,बाबुराव पाटील,खेताजी राठोड,अजित चव्हाण,पांडुरंग खोत,शफिक देवळे ,राजू राठोड रमेश मारवाडी,सदाशिव इंगळे आदी शिवसैनिक उपस्थित होते.