
कोरोनाचा प्रादुर्भाव असतानादेखील नववी, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू झाल्या. पहिल्याच दिवशी वर्गात 2 लाख 99 हजार 193 विद्यार्थी हजर होते तर 35.3 टक्के शाळा सुरू झाल्या.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील शाळा सुरू झालेल्या नाहीत पण आतापर्यंत मुंबईतील 7 हजार 715 शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांपैकी 21 शिक्षकांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. राज्यभरात एकूण 1 लाख 41 हजार 720 शिक्षकांची कोरोना चाचणी झाली त्यांपैकी 1 हजार 353 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आहेत.
कोरोनामुळे राज्यातील प्रमुख जिल्ह्यातील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद आहेत. तर कोरोना आटोक्यात आलेल्या जिल्ह्यातील काही शाळा आज मार्च महिन्यानंतर विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदा उघडल्या. शिक्षण विभागाकडून 35 जिल्ह्यांच्या मिळालेल्या माहितीनुसार 25 हजार 866 शाळांपैकी 9 हजार 127 शाळा आज सुरु झाल्या.
या जिल्ह्यांतील शाळा बंद
मुंबई, पालघर, ठाणे, पुणे शहर, जळगाव, हिंगोली, धुळे, नांदेड, नाशिक, नागपूर, परभणी.
या जिल्ह्यातील शाळा सुरू
अमरावती, गडचिरोली, धाराशीव, सातारा, सोलापूर, अकोला, यवतमाळ, लातूर, जालना, संभाजीनगर, नंदुरबार, बुलढाणा, गोंदीया, चंद्रपूर, भंडारा, रत्नागिरी, सांगली, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, वाशीम, बीड, पुणे ग्रामीण, वर्धा
सोलापूर जिह्यात सर्वाधिक 85 हजार 660 विद्यार्थ्यांची उपस्थिती. जिह्यातील 940 शाळा भरल्या.
वर्धा जिल्ह्यातील केवळ 918 विद्यार्थीच हजर. 50 शाळ्च भरल्या.
44 हजार 313 शिक्षकेतर कर्मचाऱयांची कोरोना चाचणी करण्यात आली त्यांपैकी 290 कर्मचाऱयांची चाचणी पॉझिटीव्ह आली.
राज्यात एकदिवस आड शाळा भरणार आहेत. त्यानुसार पहिल्या दिवशी 50 टक्के विद्यार्थी उपस्थित होते. जे शाळेत येऊ शकणार नाहीत, अशा विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग चालू रहाणार आहेत.
– वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री
जिल्हा शाळा भरल्या विद्यार्थी उपस्थिती
रत्नागिरी 204 7017
रायगड 229 6066
सांगली 332 13790
पुणे 215 9431
सिंधुदुर्ग 82 3765
कोल्हापूर 260 15,112
नगर 278 5560
सातारा 713 28,669
संभाजीनगर 534 25,493
अमरावती 520 1209
गडचिरोली 272 2329
धाराशीव 445 11733
अकोला 462 6956
यवतमाळ 645 15421
लातूर 746 16,754
जालना 409 6996
नंदुरबार 250 3078
बुलढाणा 423 6438
गोंदीया 209 9496
चंद्रपूर 358 8573
बीड 236 2628
वाशीम 119 2916



























































