
कोरोनावरील लस येण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिल्यामुळे पालिकेनेही लस साठवणुकीसाठी कांजूर मार्ग येथील इमारतीची जागा निश्चित केली आहे. या ठिकाणी पालिकेने मार्केटसाठी बांधलेली पाच मजली संपूर्ण भव्य इमारत सध्या उपलब्ध आहे. सद्यस्थितीत इमारतीचा एक मजला वापरण्यात येणार असून गरजेनुसार आवश्यक जागा वापरण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
कोरोनावर लस शोधण्यासाठी हिंदुस्थानसह अनेक देशांचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आहेत. पुण्याची सिरम इंन्स्टिटय़ूट, अमेरिका, चीनसह अनेक देशांचा यात समावेश आहे. डिसेंबर 2020 किंवा 2021च्या सुरुवातीला ही लस उपलब्ध होईल, असे संकेत आहेत. ही लस उपलब्ध झाल्यास कोटय़वधी नागरिकांकडून याची मागणी होणार आहे. कोरोना लस साठवणुकीसाठी 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमान लागते. तर काही लसींसाठी मायनस 20 अंश सेल्सिअस तापमान साठवणुकीची व्यवस्था उपलब्ध असावी लागणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. आगामी काळात ज्या प्रमाणे, ज्या प्रकारच्या लसी उपलब्ध होतील त्याच्या आवश्यकतेनुसार पालिकेच्या माध्यमातून या इमारतीत व्यवस्था करता येईल, अशी माहितीही काकाणी यांनी दिली. कांजूर मार्गमध्ये परिवार पार्पशेजारी कांजूर मार्ग पोलीस स्टेशनसमोर ही म्युनिसिपल मार्पेटची नवीन बिल्डिंग सध्या उपलब्ध आहे. तिचा वापर पालिका लस स्टोरेजसाठी करणार आहे.
पहिली लस कोरोना योद्धय़ांनाच!
– कोरोनाला रोखण्यासाठी सद्यस्थितीत तरी कोणतेही औषध उपलब्ध नसले तरी सहाय्यक उपचारांच्या बळावर कोरोनाबाधितांवर उपचार केले जात आहेत. यात अडीच लाखांवर कोरोनाबाधित आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आरोग्य कर्मचाऱयांसह पालिकेचे कर्मचारी कोविड योद्धा बनून कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. z शेकडो जणांनी या कोरोना लढय़ात आपला जीव गमावला आहे. त्यामुळे इतरांसाठी आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱया कोविड योद्धय़ांनाच पहिल्यांदा कोरोना लस दिली जाईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. यात डॉक्टर्स, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, वॉर्ड बॉय यांच्यासह कोविड संदर्भात काम करणाऱया कर्मचाऱयांना ही लस दिली जाईल, असेही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.



























































