पुण्यात नीरा विक्रेत्याला धमकावून रोकड लुटली 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीरा विक्रेत्याला धमकावून चोरट्यांनी रोकड लांबविल्याची घटना कोथरूड भागात घडली. याबाबत निलेश साहेबराव भंडारी (वय 25)  यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहा चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भंडारी यांचे पौड रस्त्यावरील भुसारी कॉलनी परिसरात नीरा विक्रीचे छोटे दुकान आहे. दोन दिवसांपूर्वी दुपारी साडेचारच्या सुमारास सहा चोरटे भंडारी यांच्या दुकानाजवळ आले. चोरट्यांनी त्यांना धमकावून मारहाण करीत गल्लयातील 700 रुपयांची रोकड चोरून नेली.