
कोरोनामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग घेत आहे. मात्र या वर्षी होणाऱया बोर्डाच्या परीक्षा मात्र ऑफलाइन घेतल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाऊन लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे.
सीबीएसईचे संचालक डॉ. जोसेफ इमॅन्युअल यांनी सांगितले, ‘परीक्षांची तारीख अद्याप निश्चित झाली नाही. परीक्षांच्या आयोजनासंदर्भात सध्या विचारविनियम सुरू असून परीक्षा मात्र लेखी स्वरूपात ऑफलाइन घेण्याचे ठरले आहे.’
परीक्षेवेळी कोरोनाबाबत सर्व नियमांचे पालन केले जाणार असून विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाऊन प्रात्यक्षिक परीक्षा देता न आल्यास त्यासाठी दुसरा पर्याय शोधण्यात येत असल्याचेही जोसेफ यांनी सांगितले.




























































