
संकट आले की आपल्याला वन आठवते असे होता कामा नये असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच राज्यातील वनसंपत्ती वाढवली पाहिजे असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नवीन वन संहितेचे प्रकाशन तसेच इ वाहतुक परवाना पद्धतीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याच कार्यक्रमात यवतमाळ येथील अगरबत्ती केंद्रासाठी सायकल अगरबत्ती ब्रँड सोबत सामंजस्य करार झाला.
बैठकीस वन मंत्री संजय राठोड, पर्यावरण तसेच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी सुनील लिमये, श्री. काकोडकर यांच्यासह नागपूर आणि पुणे विभागातील वन विभागाचे अधिकारी दुरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, वन आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे. सोयीप्रमाणे काम करणे योग्य नाही. कुठली अडचण आली, संकट आले की आपल्याला वन आठवते असे बरोबर नसल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.
ग्लोबल वॉर्मिंग ही संकटातच आठवत पण एकीकडे झाडांची कत्तल करायची आणि दुसरीकडे ग्लोबल वॉर्मिंगवर बोलायचे हे बरोबर नाही जे वन आज आपल्याकडे आहे ते जपले पाहिजे वाढवले पाहिजे. वन विभाग हे काम करत आहे त्यांना मी पुढच्या पिढीच्या वतीने धन्यवाद देतो असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.































































