
पश्चिम रेल्वे कामगारांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या जॅक्सन को. ऑप. व्रेडिट सोसायटी अर्थात जेसी बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत रेल विकास आघाडीचे दोन्ही उमेदवार अरूण कुमार दुबे आणि श्रीपृष्ण मुणगेकर यांचा विजय झाला आहे.
जेसी बँकेची निवडणूक मार्च 2020 मध्ये जाहीर झाल्याने पश्चिम रेल्वे स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष रमेश गवळी रेल्वे मजदूर संघाचे तत्कालिन झोनल सेक्रेटरी स्व.दादा माहुरकर व प्रेसिडेंट शरीफ पठाण व ऑल इंडिया एस.सी. व एस.टी. एम्प्लॉईज असो.च्या शकुंतला वाव्हळ यांनी ही निवडणूक राज्यात आलेले आघाडीचे सरकार पाहता एकत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. डिव्हीजनमधील दोन डायरेक्टरच्या जागांपैकी एक पश्चिम रेल्वे स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस अरूण कुमार दुबे आणि रेल मजदूर संघाचे श्रीकृष्ण मुणगेकर यांनी लढण्याचे ठरले. कोविड प्रादुर्भावाने ही निवडणूक पुढे ढकलली. 26 नोव्हेंबर रोजी ही निवडणूक पार पडली. रेल विकास आघाडीने अमळनेर, नंदुरबार, सुरत, बलसाड, उधना, डहाणू, विरार व मुंबईतील सर्व भागात जोरदार प्रचार करून ही चुरशीची निवडणूक जिंकली. या प्रतिष्ठsच्या निवडणूकीची प्रचाराची व इतर रणनीती सर्व जबाबदारी लोकाधिकार समितीतर्पै सुनील मयेकर, संतोष चौधरी व रेल मजदूर संघातर्फे राजेश पंदीरकर व किरण पाटील यांनी सांभाळली.


























































