
वाढदिवसाला कपडे काढून नग्नावस्थेत नाच करत महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना साळुंके विहारमधील ग्राफीकॉन सोसायटीमध्ये घडली. याप्रकरणी तिघांविरुध्द कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी एकाला अटक करण्यात आली आहे.
राज उर्फ कैलास महेश गणात्रा (वय 47) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर त्याचे साथीदार अमोल कंडई व सिद्धार्थ शेट्टी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका 37 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
तिन्हीही आरोपी फिर्यादी महिलेच्या ओळखीचे आहेत. 25 ऑक्टोबरला राजचा वाढदिवस असल्याने महिला त्याच्या घरी गेली होती. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या राज उर्फ कैलास, अमोल आणि सिद्धार्थ यांनी गाण्याच्या तालावर नाच सुरू केला. त्यानंतर प्रत्येकाने अंगावरील सर्व कपडे काढून महिलेसमारे नग्नावस्थेत नाचू लागले. त्यानंतर त्यांच्या अंगाला हात लावून अश्लील वर्तन केले. महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून त्यांच्यावर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला. घटनेचा धक्का बसल्याने महिला तब्बल महिनाभर आजारी असल्यामुळे त्यांनी उशिरा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
वाढदिवसानिमित्त महिला आरोपीच्या घरी गेली असता, आरोपींनी स्वतःचे कपडे काढून महिलेशी अश्लील वर्तन केले आहे. याप्रकरणी आरोपीविरूद्ध महिलेच्या विनयभंगासह अनुसूचित जाती-जमाती अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रकरणाचा तपास केला जात आहे.
– एस. मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस ठाणे































































