
शेतातील इलेक्ट्रिक मोटरपंप चोरी करणाऱ्या आरोपींना कराड शहर पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींनी मुंढे गावच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी 4 मोटर चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून यांमधील 45.210/- रूपये किमतीचे एकूण 4 इलेक्ट्रीक पानबुडी व मोनोबॉल्क मोटरपंप व गुन्हयात वापरलेल्या 2 मोटरसायकली असे एकूण 72,210/- रूपये रकमेचा मुद्देमाल जप्त केला आहे.
संशयित आरोपींनी शेतातील मोटरपंप चोरीचे गुन्हे केले असल्याची माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील, पोलीस हवालदार सुभाष फडतरे, सहा.फौजदार राजेंद्र पुजारी,पोलीस नाईक सचिन साळुखे, पोलीस कॉन्स्टेबल तानाजी बागल, गृहरक्षक दलाचे चंद्रशेखर म्हेत्रे यांनी हॉटेल रॉयल पॅलेसचे बोगद्याजवळ सापळा रचून संशयित आरोपींना अटक केली आहे.
पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक धीरज पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीसांनी मोटर पंप चोरीचे गुन्हे उघड केले आहेत. मोटरपंप चोरी करणारे गुन्हेगारांबाबत माहीती काढावी अशा सुचना दिलेल्या होत्या. या अनुशंगाने खास खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. सदर गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार सुभाष फडतरे हे करीत आहेत.






























































