
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर रोड रेल्वेस्टेशन जवळ आज सायंकाळी 7.30 च्या सुमारास ट्रक आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले. या अपघातात कार चालक गाडीत अडकला होता. त्याची तेथून सुटका करुन त्याला गंभीर जखमी अवस्थेत संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती संगमेश्वरचे पोलीस निरिक्षक उदय झावरे यांनी दिली .
या अपघातात 2 जण ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र त्यांची नावे अद्याप समजलेली नाहीत . कारचा चालक अपघातानंतर गाडी मध्ये अडकून पडला होता. त्याला इतर वाहन चालक आणि पोलीसांनी गाडी बाहेर काढले. या अपघातात तो देखील गंभीर जखमी झाला असून त्याला संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक काही विस्कळीत झाली होती . दरम्यान अपघातानंतर ट्रक चालक फरार झाल्याचे उपस्थितांनी सांगितले. अपघातग्रस्त कारमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून गाडीत एकूण सात प्रवासी होते. उर्वरित चौघांना किरकोळ दुखापत झाली. या अपघाताबाबत संगमेश्वर पोलीस मदतकार्य आणि तपास करीत आहेत .































































