सायबर क्राइम ठरतेय डोकेदुखी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सायबर क्राईमच्या वाढत्या घटनांमुळे गेल्या वर्षभरात जागतिक अर्थव्यवस्थेचे तब्बल 1 ट्रिलीयन डॉलर म्हणजेच 73 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हे प्रमाण ग्लोबल जीडीपीच्या 1 टक्का आहे. 2018 मध्ये सायबर क्राईममुळे 600 बिलीयन डॉलरचे नुकसान झाले होते. त्या तुलनेत गतवर्षीचे नुकसान 50 टक्क्यांहून अधिक आहे. सायबर सिक्युरिटी फर्म मॅकेफीच्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

वाढत्या गुह्यांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला वर्षभरात 73 लाख कोटींचा फटका

अहवालानुसार, दोन तृतीयांश कंपन्यांना सायबर क्राईमचा फटका बसला आहे. यात आयपी ड्रेस चोरी आणि फायनान्शियल क्राईमचे प्रमाण 75 टक्के आहे. मॅकेफीने ’द हिडन कॉस्ट ऑफ सायबर क्राईम’ हा अहवाल स्ट्रटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजच्या (सीएसआयएस) मदतीने तयार केला आहे. अभ्यासात 92 टक्के कंपन्यांनी मान्य केले की, सायबर क्राईममुळे घटनांमुळे त्यांच्या वर्प अवर्सचे मोठे नुकसान झाले आहे तसेच त्यांच्या उद्योगावर याचा नकारात्मक परिणाम झाला आहे.

  • सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 56 टक्के कंपन्यांनी सांगितले की त्यांच्याकडे सायबर हल्ले रोखण्यासाठी कोणतीही योजना नाही. सायबर हल्ल्यांपासून वाचण्यासाठी 951 कंपन्यांकडे रेस्पॉन्स प्लॅन तयार आहे. त्यापैकी 32 टक्के कंपन्यांनी आपला रिस्पॉन्स प्लॅन प्रभावी होता,