शेतकरी आंदोलन; केंद्र सरकारचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला, 14 डिसेंबरला देशभरात धरणे प्रदर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतकर्‍यांनी कृषी कायद्याबाबतचा केंद्र सरकारचा प्रस्ताव नाकारला आहे. शेतकरी नेते म्हणाले की, कृषी कायद रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन आणखीन तीव्र करू. शेतकरी भाजप नेत्यांना घेराव घालतील. तसेच 14 डिसेंबर रोजी कृषी कायद्याविरोधात देशभरात धरणे प्रदर्शन करण्यात येईल. दिल्लीचे रस्ते आम्ही जाम करू, असं शेतकरी नेते म्हणाले आहेत.

We reject the government’s proposals: Darshan Pal, President of Krantikari Kisan Union at Singhu (Delhi-Haryana border)#FarmLaws pic.twitter.com/FmBgyqAiU2

शेतकरी नेते पुढे म्हणाले की, ‘जयपूर-दिल्ली महामार्ग 12 डिसेंबरपर्यंत रोखण्यात येणार आहे. पूर्ण देशात आंदोलन होणार.’ शेतकरी नेत्यांनी पत्रकार परिषदेत घेत म्हणाले, दिल्ली आणि जवळच्या राज्यातील शेतकऱ्यांना ‘दिल्ली चलो’चं आम्ही आवाहन करणार आहे. शेतकरी नेत्यांनी रिलायन्स जिओच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची घोषणा केलीही आहे.