
व्हॉट्स अॅपने कार्ट्सचा पर्यायाच्या माध्यमातून शॉपिंग करण्याचा अनुभव अधिक सुकर केला आहे. व्हॉट्स अॅपवरील हे कार्ट फीचर ई कॉमर्स साईटवरील ’अॅड टू कार्ट’प्रमाणेच काम करणार आहे. यासाठी तुम्ही फॉलो करत असलेल्या कोणत्याही बिझनेस अकाऊंट मध्ये जा, कॅटलॉगमधून तुम्हाला हव्या असलेल्या वस्तूंची निवड करा आणि तुमची खरेदी पूर्ण झाल्यानंतर कार्ट तुम्ही मेसेजच्या स्वरूपात त्या व्यावसायिकाला पाठवू शकता. लवकरच हे फीचर सर्व अकाऊंटवर पाहता येईल.


























































