ईपीएफमध्ये मिळणार 8.50 टक्के व्याज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नोकरदारांना खुशखबर आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यात डिसेंबरअखेरपर्यंत एकरकमी 8.50 टक्के व्याज जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सप्टेंबरमध्ये केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ईपीएफने 8.15 टक्के आणि 0.35 टक्के अशा दोन भागांत व्याज देण्याचा निर्णय घेतला होता.