
एक कोटीहून अधिक घरांच्या भिंतीवर विराजमान असलेले सुमंगल प्रकाशनाचे ‘कालनिर्णय’ मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी, कन्नड, तामिळ आणि तेलगू या सात भाषांमध्ये प्रकाशित झाले आहे.
गेली 48 वर्षे विविध उपक्रमाद्वारे ‘कालनिर्णय’ने मराठी माणसावरच नक्हे तर हिंदुस्थानी मनावर आपला सांस्पृतिक ठसा उमटवला आहे. पंचांग, भविष्य, सणवार, तिथी, नक्षत्रे, शास्त्र्ाार्थ हे दिनदर्शिकेतील प्रमुख भाग असून पंचांग जनसामान्यांसाठी सोपे व सुलभ आहे. कालनिर्णयने वेगवेगळ्या घटकांचा विचार करून श्री स्वामी समर्थ अवधूत पंचांग, स्वादिष्ट, आरोग्य, मोठे व छोटे ऑफिस, मिडीयम, कार, मिनी, मायक्रो, वर्ष- चंद्रिका, विकली नोट प्लॅनर, पॉकेट डायरी, इयर प्लॅनर अशा विविध प्रकारांतील आवृत्त्या प्रकाशित केल्या आहेत. तसेच वेबसाइट, अॅप अशा उपक्रमांद्वारे कालनिर्णय नेहमी काळासोबत चालत आले आहे. ‘कालनिर्णय’ला जगातील सर्वाधिक खपाचे प्रकाशन असल्याचा बहुमान ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेने दिला आहे. लोकांच्या गरजा लक्षात घेऊन उपयुक्त प्रकाशने वेळोवेळी उपलब्ध करून दिली आहेत आणि भविष्यातही केली जातील, असा विश्वास संपादक प्रकाशक जयराज साळगावकर यांनी व्यक्त केला.





























































