
हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 17 डिसेंबरपासून अॅडलेड येथे पहिल्या कसोटी प्रारंभ होणार आहे. या डे-नाईट कसोटीसाठी टीम इंडियाचा अंतिम 11 जणांचा चमूमध्ये कोण कोण असेल याची चर्चा रंगली होती. अखेर आज बीसीसीआयने अंतिम अकराची यादी जाहीर केली आहे. या टीममध्ये रिद्धिमान साहा व पृथ्वी शॉला जागा मिळाली असून केएल राहुल व रिषभ पंत यांना वगळण्यात आले आहे.
हिंदुस्थानकडे सलामीवीराच्या जागांसाठी चार पर्याय होते. यामध्ये पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, शुभमन गिल व लोकेश राहुल या खेळाडूंचा समावेश होता. या पैकी पृथ्वी शॉ, मयांक अगरवाल यांची निवड झाली आहे.रिद्धीमान साहा व रिषभ पंत या यष्टिरक्षकांमध्येही कमालीची चुरस होती. मात्र रिषभ पंतच्या ऐवजी रिद्धिमान साहाला संघात संधी देण्यात आली आहे.
असा आहे संघ
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, पृथ्वी शॉ, हनुमा विहारी, रिद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह
UPDATE: Here’s #TeamIndia’s playing XI for the first Border-Gavaskar Test against Australia starting tomorrow in Adelaide. #AUSvIND pic.twitter.com/WbVRWrhqwi
— BCCI (@BCCI) December 16, 2020
ती 40 ते 50 मिनिटे फलंदाजांसाठी आव्हानात्मक
अॅडलेड येथील डे-नाईट कसोटी गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणार आहे. या स्टेडियममध्ये फ्लडलाइट्स सुरू करण्यात आल्यानंतर गुलाबी चेंडूमध्ये होणार फरक फलंदाजांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. याबाबत अजिंक्य रहाणे म्हणाला, लाल चेंडू आणि गुलाबी चेंडू या दोन्ही प्रकारच्या चेंडूने कसोटी क्रिकेट खेळण्यात फरक आहे.
20 विकेट घेण्याची क्षमता
अनुभवी गोलंदाज इशांत शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकणार आहे. यावेळी अजिंक्य रहाणे म्हणाला, इशांत शर्मा हा हिंदुस्थानचा अनुभवी गोलंदाज आहे. त्यामुळे त्याची अनुपस्थिती नक्कीच जाणवेल, पण आमच्याकडे प्रतिस्पर्धी संघातील 20 फलंदाज बाद करण्याची क्षमता नक्कीच आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी या दोघांसह नवदीप सैनी, मोहम्मद सिराज व उमेश यादव यांच्याकडूनही अपेक्षा आहेत.




























































